पुनावळे, चिंचवड-
नव चैतन्याच्या मंडळाचे श्रावणा निमीत्त भजन झाले. मंडळाच्या मुख्य माननीय माधुरी ओक, सभासद सदस्य सगळ्यांनी भजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. मान.सीमा मुळे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. विविध भजने ताला सुरात गायली. त्याला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
मा.अनुराधा ताईंनी जोगवा सादर केला. अनिका पिकॅडिली सदस्या, सगळ्या़च्या आग्रहाखातर सौ.माधुरी यांनी “मी किती सांगु मी कुणाला आज आनंदी आनंद झाला” हे गीत गायले. सर्व उपस्थित मैत्रीणींना आनंद झाला.
“आमच्या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय सायंकाळ आहे. आमच्या कुटुंबाला शुभेच्छा, देत आशिर्वाद ही दिले, “असे सौ. माधुरी यांनी मत व्यक्त केले.
अरुणा ताई, भिसे आजी, विनीता ताई, अंजु ताई, अनघा ताई, अलकाताई वेळात वेळ काढून आल्या. केळकरताई, शिवाय आपला बिझनेस सोडुन आवर्जुन उपस्थित राहिलेल्या ममीली दुकानांच्या मालकीण मीनल ढेरे, कविता बिराजदार ताई, रेश्मीताई सगळ्या आमच्या कुटुंबाला प्रेमळपणे साथ देताना आज अनिका पिकाडेलीच्या मैत्रीणीना अनुभवता आले.
त्यांनीही उतम साथ दिली. समवयीन व तरुण मैत्रीणीनी दिलेली साथ अवर्णनीय आहे.
सौ. पुजा व डॉ.साईप्रसाद कुमठेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
उभयतांनी मनापासून मेहनत घेतली हेही या निमित्ताने मैत्रीणींना अनुभवता आले.
एक उत्तम योगायोग म्हणजे आज बाबुजी ना प्रभू श्रीरामाची प्रतिमा त्यांच्या दौंड येथील शालेय बाल मित्रांनी, डॉक्टर धीरेंद्र मोहन (केडगाव), निलीमा शिकारखाने (संपादिका), बच्चू परमार, नामदेव गाडीलकर (शिक्षण संस्था अहमदनगर), किशोर गायकैवारी, नरेश तारे या संयोजक मित्रांनी स्नेह संमेलनाची आठवण म्हणून सस्नेह भेट दिली. कार्यक्रम संपण्यापूर्वीच श्रीराम मूर्ती आल्याने ती स्थापित करण्यात आली.
बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
9890567468