You are currently viewing महाविकास आघाडीतर्फे कुडाळात सरकारविरोधात “जोडे मारो” आंदोलन…

महाविकास आघाडीतर्फे कुडाळात सरकारविरोधात “जोडे मारो” आंदोलन…

महाविकास आघाडीतर्फे कुडाळात सरकारविरोधात “जोडे मारो” आंदोलन…

कुडाळ

महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ गांधी चौक येथे आज सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला राज्य शासन जबाबदार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यसरकारवर जोरदार टीका केली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, शिवसेना ठाकरे गट युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, शिवाजी घोगळे, प्रसाद रेगे, प्रकाश जैतापकर, अभय शिरसाट, संतोष शिरसाट, गंगाराम सडवेलकर, तरबेज शेख, अय्यास खुल्ली, अजीम खान, नझिर शेख, आत्माराम ओटवणेकर,जयराम डिगसकर, लालू पटेल, प्रसाद सावंत-भोसले आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा