जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं. चा उपक्रम – दिग्दर्शक दिपक कदम
वैभववाडी
नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत नांदगावातील मुला मुलींच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी २ महिन्याचे गायन,नृत्य,अँक्टींग प्रशिक्षणाचे नुकतेच उद्घाटन मराठी नामवंत दिग्दर्शक दिपक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपट अभिनेते राजू राणे ,चित्रपट सिरियल अभिनेता सुधीन तांबे ,पार्श्वगायीका मयुरी नेवरेकर –चिंदरकर ,नांदगाव पं.स.सदस्या हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर,उपसरपंच निरज मोरये ,ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर,ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर,सदस्या वृषाली मोरजकर ,ईशा बिडये,रमिजान बटवाले,डॉ.दिशा वाळके,श्रीमती शेलार तसेच गावातील मुले ,पालक वर्ग उपस्थीत होते. दिग्दर्शक दिपक कदम म्हणाले, सिंधूदूर्ग जिल्हयात प्रथमच नांदगाव ग्रा.पं.च्या या 14 वा वित्त आयोगातून मुलांना सांस्कृतिक कलेसाठी प्रशिक्षण देत आहे हे खरोखरच कौतूकास्पद राबविले असून यातूनही मुलांचा विकास होनार असल्याचे मत व्यक्त केले . पं. स.सदस्य हर्षदा वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर ,सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर आभार सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी मानले .