श्री पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता महिला सबलीकरण कार्यशाळा.
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी ( स्वायत्त)
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महाविद्यालयीन महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय महिला सबलीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता होणारया कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ श्रद्धाराजे भोंसले, यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून सौ.नीता शिवराम नातू अध्यक्षा ,बचत गट आरोस व युवा उद्योजक कुणाल बीपीन वरसकर हे मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाचे नियोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालय (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी एन हिरामणी, प्रा. एम ए ठाकूर, महाविद्यालयीन महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. सौ नीलम धुरी, सदस्या डॉ.सौ प्रतीक्षा सावंत, डॉ. सौ प्रगती नाईक, प्रा.सौ कविता तळेकर डॉ.सौ सुनयना जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या महिला सबलीकरण कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.