पिंगुळी मानाची दहीहंडी सोहळा मोठ्या दिमाखदार साजरा
गोविंदा पथक,बॉडीबिल्डिंग शो,फेमस डान्स सोलो, ग्रुप डान्स आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम,रसिक प्रेक्षकांच्या तुफानी जलोषात साजरा,जय वेतोबा गोविंदा पथक वेताळबांबर्डेनें फोडली मानाची दहीहंडी*
*सिद्धिविनायक स्पोर्ट्स, युवा प्रतिष्ठान, श्री. देव वडगणेश मित्रमंडळ आणि स्वस्तिक प्रतिष्ठान आयोजित पिंगुळी मानाची दहीहंडी सोहळा मोठ्या जलोषात साजरा झाला. पिंगुळी गावातील ह्या सर्व मंडळानी एकत्र येत पहिल्याच वर्षी हा सोहळा अतिशय जबरदस्त पार पाडला. यावेळी उदघाटन प्रसंगी व्यासपीठावर हॉटेल लाईमलाईट चे मालक प्रदीप माने, मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब, मिलिंद परब,मा.जि. प अध्यक्ष विकास कुडाळकर,तंटामुक्ती अध्यक्ष राघोबा धुरी, विष्णू धुरी,संकेत धुरी,दत्तगुरु राऊळ, बबलू पिंगुळकर, गणेश भगत, संजय परब, नितीन शिरसाठ ग्रा. प. सद्यस्य ममता राऊळ, आयाज खुल्ली, गुरु वाळके, राजन गावडेआदी मान्यवर उपस्थित होते.*
*यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालूक्यातील गोविंदा पथकांनी या मानाच्या दहीहंडी सोहळ्यास आपली सलामी दिली.सिंधुदुर्ग श्री किताब विजयाची रेकॉर्ड नावावर असलेले बांदेश्वर फिटनेस क्लब चे मालक संदेश सावंत आणि सिंधुदुर्ग श्री विजयी अमित कदम यांच्या बॉडीबिल्डिंग शो तसेच गिअर अप जिमच्या बॉडी बिल्डरनी सादर केलेल्या शो ला उपस्थिताचा भरभरुन प्रतिसाद मिळाला.
*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित डान्सरांनी ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स चे एकसो एक सादरीकरण केले. संकेत पाटकर ह्या युवा गायकानें आपल्या गायनाने चार चांद लावले.फटाक्याची आताषबाजी, बहारदार डान्स सादरीकरण, सर्व युवाईचा जलोष आणि गोविंदा पथकांचे थरांवर थर, प्रेक्षकांची तोबा गर्दी यामुळे पिंगुळी मानाची दहीहंडी रेकॉर्डब्रेक झाली. एकुण १४ पथकानी सहभाग दर्शविला.
*यावेळी पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, मा.जि. उपाध्यक्ष रणजित देसाई, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर परब, ग्रा. प सदस्य शशांक पिंगुळकर, हेमंत जाधव,युवा उद्योजक गणेश म्हाडदळकर, अॅड.आनंद गवंडे,ग्रा.प. सदयस मंगेश चव्हाण, साईराज जाधव अनिल गावडे, जगनाथ गावडे, अभी गोवेकर, रणजित रणसिंग उपस्थित होते. पिंगुळी गावातील कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती नी या मानाच्या दहीहंडीस आपली उपस्थिती दर्शविली.पिंगुळी गावातील ह्या सर्व युवा मंडळाने केलेल्या ह्या आयोजन व नियोजनाचे सर्व स्तरांतुन कौतुक केले जात आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले