You are currently viewing मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती गवस – कदम 

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती गवस – कदम 

झोळंबे गावची कन्या तर देवगडची स्नुषा अँड सौ. रेवती गवस – कदम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती

 देवगड : 

 

झोळंबे गावची कन्या अँड सौ. रेवती सुधाकर गवस आणि आता देवगडची स्नुषा सौ. रेवती वैभव कदम हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी (पि ए) नियुक्ती झाली आहे. राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल अँड सौ. रेवती गवस – कदम यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

बीकॉम एलएलबीचे शिक्षण घेतलेल्या अँड सौ. रेवती गवस – कदम यांनी चार वर्षे सिटी सिव्हिल कोर्टात हायर स्टेनो म्हणून काम केले. या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २००० उमेदवार परीक्षेस बसले होते. त्यातुन पहिल्या दोन परिक्षेत १६० उमेदवार निवडण्यात आले. दुसऱ्या परीक्षेसाठी ३६ उमेदवार निवडण्यात आले. तर शेवटच्या तिसऱ्या परीक्षेसाठी १५ उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात अँड सौ. रेवती गवस – कदम यांचा ९ वा क्रमांक आला.

अँड सौ. रेवती गवस – कदम यांचे पती वैभव कदम इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून ते आर. बी. एल. बॅकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. वडील सुधाकर गोपाळ गवस हे ठाणे न्यायालयातुन ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले. अँड सौ. रेवती गवस – कदम यांना वडिलांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तर छोटी बहीण कु.भाग्यश्री गवस ही वकील असुन तिने दोन वर्षे वकिली केल्यानंतर सध्या ती एच. डि. एफ. सी. बॅकेत आहे. आई सौ. सुजाता यांनी अँड सौ. रेवती गवस – कदम यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी खुप मेहनत घेतली. पुढील शिक्षणासाठी वडीलांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या दोन्ही मुली अभ्यासात हुशार असून निश्चित ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या कठीण परिश्रम घेण्याची चिकाटी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा