You are currently viewing जातिनिहाय जनगणना परिषद : सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल

जातिनिहाय जनगणना परिषद : सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मुंबई कौन्सील) तर्फे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी, मुंबई येथे जातनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय सुनिश्चित करण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.

परिषदेसाठी प्रमुख वक्ते सुरेश सावंत हे प्रसिद्ध राजकीय व सामाजिक अभ्यासक मार्गदर्शन करणार असून अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे असणार आहेत.

प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणात त्यांचा योग्य वाटा मिळावा यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहे. पक्षाचा असा विश्वास आहे की हा डेटा विविध समुदायांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि संसाधनांचे प्रभावीपणे वाटप करण्यासाठी आवश्यक आहे. ही मागणी जनतेपर्यंत नेण्यासाठी आणि जातनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ही परिषद मोठ्या जनआंदोलनाचा भाग आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने यापूर्वीच १८ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर निदर्शने आणि मोर्चे काढले आहेत. या महत्त्वाच्या विषयासाठी सर्व इच्छुक व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई सचिव कॉ. मिलिंद रानडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा