*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पुतळे*
वृत्त जलौघवेगा
लगावली लगालगागा लगालगागा
जगात कोणी नसेल केला
अशा विवेकी पुलास सांधा
स्मरून त्यांना सदैव साथी
विचार पुतळे मनात बांधा
तुटून पडती असार शिल्पे
कशास त्यांची दुकानदारी
विभागती ते मने जनांची
प्रकार होतो विनाशकारी
नकोत असले उगाच खोटे
कशास त्यांची प्रदर्शने ती
कुठे कशाला उभे करावे
डकार येता पसार होती
चला प्रकाशू नवीन प्राची
त्यजून साऱ्या गतास आता
विचार वैभव महान सारे
सवे उभारू नवी पताका
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
@सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे