You are currently viewing राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सावंतवाडी :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत.

सकाळी ८.२० वाजता गोवा येथे त्यांचे आगमन होणार असून सकाळी ९ वाजता सावंतवाडी विश्राम गृह येथे पत्रकारांशी ते संवाद साधणार आहेत.

त्यानंतर १०.३० वाजता मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पहाणी करणार असून, राजकोट येथील महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनास उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा