You are currently viewing नटखट कान्हा

नटखट कान्हा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम गौळण*

 

*नटखट कान्हा*

 

गोंडस बाळ बाई हरि, करी दह्यादूधाची चोरी

चोरून खातोया माखन, रूप लोभस दिसे भारी !!धृ!!

 

गवळ्याच्या आम्ही गोपिका, नारी रुपगुणसुंदरी

नको अडवूस तू आम्हा, कान्हा मध्येच वाटेवरी

जाता मथुरेस फोडतो, दहीदूध मटकी सारी

चोरून खातोया माखन….. !!१!!

 

करू नको असा तू दंगा, नको छेडू गोमट्या रंगा

विनवणी किती करू मी, कुणीतरी कान्हाला सांगा

नको भिजवूस मागुनी, घडा भरते यमुनातीरी

चोरून खातोया माखन….. !!२!!

 

ठेऊ कुठे मी लपवुनी, नदीकाठी ही वस्त्रे सारी

सांग कशी नाही उरली, लज्जाच तुझिया अंतरी

संधी साधुनी पळवितो, अमुच्या साड्या गिरीधारी

चोरून खातोया माखन, रूप लोभस दिसे भारी !!३!!

 

©【दीपी】

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा