*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.दक्षा पंडित लिखित अप्रतिम अभंग रचना*
*गोकुळाष्टमी*
गोकुळ अष्टमी|जन्म श्री कृष्णाचा||
आनंदकंदाचा|
सर्वांसाठी||१||
विष्णू अवतार| दूर अंधकार||
जगाचा उध्दार|कृष्ण करे||२||
नंदाचा हा कान्हा | यमुनेच्या तिरी||
वाजवे बासरी |सुमधुर||३||
कान्हामय झाली| सगळीच सृष्टी||
प्रेमाची ही वृष्टी| सर्वांवरी||४||
गोपिकांच्या संग| रंगला श्रीहरी||
चैतन्य अंबरी| चोहिकडे|| ५||
दहीहंडी दिनी|उंच उंच थर||
गोविंदांचे कर|गगनात||६||
गोविंदा करतो|कान्हाचे स्मरण||
करील रक्षण| खात्री त्यांस||७||
श्रीकृष्ण सांगतो | गीतेतले तत्व ||
जाणावे महत्व | जीवनात ||८||
एकतेचा दिसे| भव्य अविष्कार||
जीवनाचे सार| कृष्णनिती||८||
डॉ दक्षा पंडित
दादर,मुंबई