You are currently viewing वामनराव महाडिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणजे प्रशालेचे आधारस्तंभ:दिलिपभाई तळेकर

वामनराव महाडिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणजे प्रशालेचे आधारस्तंभ:दिलिपभाई तळेकर

*वामनराव महाडिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणजे प्रशालेचे आधारस्तंभ:दिलिपभाई तळेकर*

*माजी विद्यार्थ्यांनी जपले शाळेप्रती ऋण:दिलीपभाई तळेकर*

*वामनराव महाडिक विद्यालयात दातृत्वाचे धडे: अविनाश मांजरेकर*

ज्या शाळेत आपण शिकलो,लहानाचे मोठे झालो,त्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योगपती नामदेव बांदिवडेकर, सागर डंबे,यांनी प्रशालेच्या
वर्गखोल्या नुतनीकरण करण्यासाठी बहुमोल योगदान देत शाळेप्रती ॠण जपले आहे असे प्रतिपादन कणकवली तालुका भाजपा अध्यक्ष दिलीप भाई तळेकर यांनी केले, ते प्रशालेतील नूतनीकरण वास्तूचे उद्घाटन व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.
याप्रसंगी तळेरे येथील सुप्रसिद्ध डॉ.मिलिंद कुलकर्णी,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,उपसरपंच रिया चव्हाण, उद्योजक नामदेव बांदिवडेकर, सागर डंबे,सायली डंबे,डॉ.सुहास पिसे,स्व.सुनील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशभाऊ तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजु, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर,शाळा स.सदस्य प्रवीण वरूणकर,उमेश कदम,संतोष जठार,निलेश सोरप, प्राचार्य अविनाश मांजरेकर,भजन मंडळ अध्यक्ष उदय नाना तळेकर,गंगाखेड कॉलेजचे माजी प्राध्या.मधुकर घुगे,माजी उपसरपंच शैलेश सुर्वे,शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा आर्या राऊत,माजी विद्यार्थी उद्धव व अनिरुद्ध महाडिक,ग्रामपंचायत सदस्य संदिप घाडीे,श्रावणी कॉम्प्युटर्सचे सतीश मदभावे,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थी नामदेव बांदिवडेकर,सागर डंबे व प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या सहयोगातून प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे नूतनीकरण उद्घाटनानंतर दीपप्रज्वलन व सरस्वती,छ.शिवाजी महाराज पुतळा व वामनराव महाडिक (आप्पा)यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागतगीत व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे ऋण जपत शाळेस आर्थिक सहकार्य केल्याबद्दल उद्योजक नामदेव बांदिवडेकर,सागर डंबे,प्राचार्य अविनाश मांजरेकर,माऊली फेब्रिकेशन चे मालक नितीन पांचाळ यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.विनोद धुरे,दिलीप तळेकर मित्र मंडळ,घाडीवातील कार्यकर्त्यांनी शाळेच्या सुशोभी करणासाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल तसेच सुर्वे कुटुंबाकडून उत्तम साउंड सिस्टीम भेट दिल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
याप्रसंगी दुग्ध शर्करा योग म्हणजे प्रशालेतील दहावी- बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. दहावीतून 1)समृद्धी पिसे 2)स्वानंदी डंबे 3)चैताली तळेकर,बारावी कला शाखा-1)साक्षी नेवरेकर 2) कोमल कांजीर,3) सुस्मिता गुरव,वाणिज्य शाखा1) सिद्धार्थ जठार 2)तन्वी कदम 3) दीक्षा जाधव,यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
पाचवी शिष्यवृत्ती धारक व नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झालेबद्दल जुई मेस्त्री व स्वरा परब,तसेच STS परीक्षेत सिल्वर व ब्रांझ असे मेडल प्राप्त अनुक्रमे सोहम बिरादार व वेद शेळके यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
माजी विद्यार्थी हे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत, प्रशालेतील अशा कार्यक्रमांतून विद्यार्थी दातृत्वाचे धडे घेत आहेत असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी केले.सदर कार्यक्रमात मधुकर घुगे,चंद्रकांत तळेकर,प्रवीण वरूणकर,यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा.शिक्षिका एस.यु.सुर्वे यांनी केले.

______________________________
*संवाद मिडिया*

👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗

*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*

*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*

(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*

🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.

*संपर्क:*

*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,

*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*

कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा