*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घाव वेदनांचे*
✍️✍️✍️✍️✍️
तुलाही तरी अजुनही कुठे कळले
सत्यार्थ अंतरीच्या प्रीतसंवेदनांचे
जाहल्या भावनांही निशब्द आता
उमगले सत्य भाळीच्या प्राक्तनाचे….
वास्तवात जन्मताच जीव पराधीन
जगणे केवळ खेळणे कठपुतलीचे
काय मिळविले अन काय हरविले
जे लाभले ते कर्मभोग गतजन्मांचे….
सांजपर्वात झाकोळली जरी आशा
या अंतरी प्रतिबिंब तुझेच चैतन्याचे
जरी गुदमरली आज अश्राप स्पंदने
तरीही , मीच झेलीतो घाव वेदनांचे….
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*रचना क्र.१८४
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*
*📞(9766544908)*