दहीहंडी उत्सव शांततेत आणि मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन साजरा करावा – राजेंद्र मगदूम
दहीहंडी उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील दहीहंडी उत्सव शांततेत आणि मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन साजरा करावा अशा सूचना कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सर्व सार्वजनियक दहीहंडी उत्सव मंडळांना दिल्या आहेत.
कुडाळ तालुक्यातील सर्व सार्वजनिक दहीहंडी उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची आज कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी बैठक घेतली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करून हा उत्सव उत्साहात व शांततेत पार पडण्याबाबत या मंडळांना सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यक ते शासनाने दिलेले सर्व परवाने घ्यावे. कोणताही वाद विवाद होणार नाही, खूप गर्दी तसेच चेहऱ्याचेंगरी रेटा-रेटी, महिलांच्या छेडछाडी, तसेच उंच दहीहंडीमुळे कोणताही अपघात होणार नाही, तसेच मोठ्या आवाजात ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे. तसेच अंगावर पाण्याचे फुगे मारू नये, आक्षेपार्य घोषणा व आणि फलक लावू नयेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट करून नये अशा सूचना श्री. मगदूम यांनी या मंडळांना दिल्या. यावेळी हेल्प ग्रुप, शिवसेना ठाकरे गट, साई रूप मित्र मंडळ, म्हापसेकर तिठा पिंगुळी, वडगाणेश मित्रमंडळ पिंगुळी, ,माणगाव येथील मंडळांचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बंड्या सावंत, विजया कांबळी, मंदार शिरसाट, सतीश माडये, भूषण तेजम यांनी चर्चेत सहभाग घेतला.