You are currently viewing वैभववाडीत २७ ऑगस्ट रोजी फुटणार १,११,१११ रु. ची दहीहंडी

वैभववाडीत २७ ऑगस्ट रोजी फुटणार १,११,१११ रु. ची दहीहंडी

वैभववाडीत २७ ऑगस्ट रोजी फुटणार १,११,१११ रु. ची दहीहंडी

आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाचे आयोजन

प्रसिद्ध सिने अभिनेते आदिनाथ कोठारे राहणार उपस्थित

वैभववाडी

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि वैभववाडी भाजपा आयोजित मंगळवार दि. २७ ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी उत्सव पार पडणार आहे. याप्रसंगी सिने अभिनेते आदिनाथ कोठारे उपस्थित राहणार आहेत.
वैभववाडी बाजारपेठ दुर्गामाता पटांगण याठिकाणी दहीहंडी उत्सव होणार आहे. दहीहंडी उत्सवात प्रथम पारितोषिक १,११,१११/- रोख रुपये ठेवण्यात आले आहे.

 

आमदार श्री. नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी वैभववाडी तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खासदार श्री. नारायणराव राणे, सिंधुदुर्ग पालकमंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण, माजी खासदार श्री. निलेशजी राणे, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, माजी आमदार श्री. प्रमोद जठार तसेच मराठी हिंदी सिनेसृष्ठीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध तुफान ऑर्केस्ट्राची संगीत रजनी होणार आहे.
तसेच सलामी देणाऱ्या सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तरी सर्व गोविंदा पथकांनी, रसिक प्रेक्षक व ग्रामस्थांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सुधीर नकाशे ७७४३९८६०८८, संजय सावंत ८८८९४०४०३४, अतुल सरवटे ८९७५९२२१६६, या नंबर वरती संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा