*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम हायकू काव्यरचना*
*बहिणाबाई*
हायकू……….🙏🌹
बहिणाबाई
असता निरक्षर
दंग साक्षर……
शेतमळ्यात
पाहिला भगवंत
कष्ट अनंत………
जगावेगळं
जगली तत्त्वज्ञान
स्रीचा सन्मान………
रोजचा दिन
दिसे त्यात कविता
ओठात गाता……..
शब्दांचा पाठ
आणी आचरणात
शल्य उरात……….
पेलले घाव
नियतीने दिलेले
जीवन नाव……..
जीवन गीता
काव्यातून सजली
अमर झाली………
सन्माननीय
अशी बहिणाबाई
सर्वांना प्रिय…..।।
💫💫💫🙏💫💫💫💫
अरूणा दुद्दलवार@✒️