*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान, लेखक कवी वि. ग. सातपुते लेखक अप्रतिम काव्यरचना*
*गत आयुष्याचे प्रतिबिंब*
*********************
आजला स्वप्नात मीच माझिया
गतायुष्यातील प्रतिबिंब पाहिले
कधी सुखावलो कधी दुखावलो
कळले भाळीचे पदरी पडले…..
आठवांचे सुरेख शुभ्र चांदणे
मनाअंतरी उजळीत राहिले
साठवणींचे संस्कार सोज्वळी
वात्सल्याला जगवित राहिले…..
आधार प्रसन्नतम सात्वितेचे
क्षणक्षण जीवा सावरू लागले
द्वैतअद्वैताचे ते मिलन सुंदर
जगता ,जगता उमजू लागले……
जन्मासोबती रुजताच सद्गुण
सत्यार्थ जगण्याचे कळु लागले
जन्म भोग तर सारा संचिताचा
स्वप्नात देखील उमजुनी चुकले….
************************
*रचना क्र.१७५
*#©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)*
*📞( 9766544908 )*