You are currently viewing होणार नाही ईच्छा साधी

होणार नाही ईच्छा साधी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*होणार नाही ईच्छा साधी*

 

मेणबत्ती म्हणाली काडीला

जाळून पहा बलात्कारीला

धजणार नाही परत कोणी

कुस्करायला मुक्या कळीला

 

नको काढायला कुठे मोर्चा

सुता सारखे होतील सरळ

बसता *ढुंगणावरती* रट्टे

ओकणार नाही कुठे गरळ

 

कंड येणा-या *लिंगाडूना*

प्रसाद थोडा दिलाच पाहिजे

*तोंडी राम कृतीत हराम*

असणारांना तुडवले पाहिजे

 

लोकशाहीच्या बुरख्याखाली

कितीतरी गांडूळ वळवळतात

कोण काय वाकडं करणार

*अशा भ्रमात ते असतात*

 

येऊ देत एकदा चक्की पिसून

वळवळणार नाही पुन्हा कधी

सरळ बघून निघून जातील

*होणार नाही ईच्छा साधी*

 

वि ना य क जो शी ✒️ठा णे

मीलनध्वनी/९३२४३२४१५७

प्रतिक्रिया व्यक्त करा