*एचपी सखीच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न*
*कुडाळ :
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचं गॅस विभागाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी व ग्रामीण भागात महिलांना गॅस सिलेंडर त्वरित उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून महिला सखी योजनेचा शुभारंभ आज एच पी सी एल कंपनीचे गोवा सिंधुदुर्ग रीजनल मॅनेजर साहिल गुप्ता जी, सिनी.सेल्स ऑफिसर निखिल वारकर, एचपीसीएल अधिकारी वैभव भगत कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे संचालक निलेश तेंडुलकर, विनायक अणावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी एचपीसीएल डीलर वंदन वेंगुर्लेकर अनुप तेली रायबाग कर देवगड खरेदी विक्री संघ पारकर आदी उपस्थित होते.*
*एचपीसीएल कंपनीचे वैभव भगत यांनी महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी एचपी सखीच्या माध्यमातून १०० किलो पर्यंत गॅस विक्री करण्यासाठी एचपी कंपनी तर्फे एचपी सखीची नेमणूक करण्याची योजना असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत एचपी वितरक ज्या ज्या सुविधा ग्राहकांना देतात त्या सर्व सुविधा एचपी सखीच्या माध्यमातून गावोगावी देण्यात येतील व त्याबद्दल या एचपी महिला सखीच्या योग्य तो मोबदला देण्यात येणार आहे. अशा प्रकारची पहिली योजना मध्यप्रदेश मधील इंदूरमध्ये राबवण्यात आली व तेथे ही योजना चांगल्या प्रकारे यशस्वी झालेली आहे. जिल्ह्यामध्ये १७ एचपी सखीसोबत जिल्ह्यातील वितरकांनी करार करून आज या योजनेची सुरुवात करण्यात आली.एच पी सखी यांच्या माध्यमातून ही ई केवायसी , गॅस कनेक्शन सेफ्टी चेकिंग अशा सुविधा गॅस ग्राहकांना सेवा देण्यात येणार आहेत.*