कणकवली :
जानवली २२ ऑगस्ट २०२४ रोजी हॉटेल रिलॅक्स येथे जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’ योजनेतील मक्तेदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मार्गदर्शन केले. जलजीवन कामाच्या समस्या दूर करण्यासाठी चर्चा झाली. या बैठकीत मक्तेदारांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली. ग्रामपंचायतने लोकवर्गणी न भरल्यामुळे मक्तेदारांच्या बिलातून लोकवर्गणी कपात करून घेणेत येत आहे याला विरोध करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे काम केल्यानंतर कामांना निधी येत नाही या विषयावर या विषयावरही चर्चा झाली. तसेच इतर सर्व मुद्द्यावर सकारात्मक चर्चा होऊन येत्या सोमवारी याबाबत कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरले. याच बैठकीत जिल्ह्याची जल जीवन कंत्राटदार संघटनेची नवीन कार्यकारणी नेमण्यात आली व सर्वांनी एकजुटीने संघटितपणे उभे राहून मार्ग काढण्याचे ठरले.
कार्यकारिणी खालील प्रमाणे –
अध्यक्ष दिलीप यशवंत सावंत – उपाध्यक्ष विलास गवस
सचिव उदय पाटील- खजिनदार प्रसाद कुलकर्णी
तालुका प्रतिनिधी :
सावंतवाडी – अभिषेक सावंत, दोडामार्ग – विलास गवस, कुडाळ – गुरुप्रसाद तवटे, मालवण – सागर माळवदे, वेंगुर्ला – संजीव परब, कणकवली – सर्वेश दळवी, देवगड – प्रसाद कुलकर्णी. सर्वानुमते कमिटी निवडून, मार्गदर्शक म्हणून श्री संदेश उर्फ गोट्या सावंत व सल्लागार म्हणून बाबा आंगणे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.
या बैठकीला जिल्ह्यातील बहुसंख्य कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते. या बैठकीला संदेश उर्फ गोट्या सावंत, दिलीप सावंत, बाबा आंगणे, बिपिन कोरगांवकर, उदय पाटील, विलास गवस, गुरु पालकर, प्रसाद मोरजकर, गुरु प्रसाद तवटे , अभिषेक सावंत व जिल्ह्यातील बहुसंख्य कॉन्ट्रॅक्टर्स उपस्थित होते.
या बैठकीत काम निहाय एक हजार रुपये वर्गणी काढून ती राज्य संघटनेकडे जमा करण्याचे ठरले. सदर रक्कम तालुका प्रतिनिधी कडे लवकरात लवकर जमा करावी असे ठरले.