You are currently viewing कलियुग…(अष्टाक्षरी रचना)

कलियुग…(अष्टाक्षरी रचना)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कलियुग…* (अष्टाक्षरी रचना)

 

कसा कलियुगी फेरा

जग पुजे अंधकारा…

कुठे युद्धाचे सावट

कुठे आतंक बुहारा…।। १ ।।

 

गेली युगे तीन ऐसी

सुखसमृद्धीची नांदी…

आले घोर कलियुग

जसे सुकलेली फांदी…।। २ ।।

 

नीतिमत्ता ढासळली

फक्त उरले भाषण…

जनी अनीतीचा पुर

नाही राहिले धोरण…।। ३ ।।

 

शब्द वचने गहाळ

झाली जिव्हा ती वाचाळ…

कशी शब्द फिरवुनी

घात करीते लबाड…।। ४ ।।

 

नर असो किंवा नारी

झाले स्वैर युक्तिवादी…

देशी सभ्यता संस्कृती

झाली लुप्त, जशी खादी!…।। ५ ।।

 

कशी कलियुगी माया

किर्र दाटला अंधार…

भावी पिढीचे भविष्य

झाले दिसेनासी भोर…।। ६ ।।

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा