You are currently viewing जनता दरबारातील तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जनता दरबारातील तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जनता दरबारातील तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

प्राप्त तक्रारींवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी

 पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १२ ते १४ ऑगस्ट रोजी विधानसभा क्षेत्र निहाय जनता दरबार पार पडला होता. या जनता दरबारात प्राप्त अर्जांचे निराकरण करण्यात आले तर काही तक्रारी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. निराकरण न झालेल्या तक्रारींवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज दिले.

जनता दरबारच्या अनुषंगाने आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उप विभागीय अधिकारी हेमंत निकम, जगदीश कातकर, श्रीमती ऐश्वर्या काळुशे तसेच सर्व तहसिलदार आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राप्त तक्रारींवर  विभाग प्रमुखांनी सकारात्मक निर्णय घेऊन तसा अहवाल प्रशासनाला सादर करावा असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा