गेल्या आठवड्यात बांगलादेशात अराजक निर्माण होऊन, बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. तो राजीनामा दिल्यानंतर आपले संरक्षण करण्यासाठी त्यांना भारतात यावे लागले.
कारण शेख हसीना पंतप्रधान होण्याच्या आधी सनातनी धर्म वेड्या राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष असलेली. राज्यघटना बदलून धर्मनिष्ठ म्हणजे धर्मांध राज्यघटना संपूर्ण देशात जारी केली. यामुळे शेख हसीना यांनी सत्तेत आल्यावर ती धर्मनिष्ठ राज्यघटना पुन्हा बदलण्याचा प्रयत्न केला पण ती बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाकडून बदलली गेली नाही. त्यानंतर शेख हसीना यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढील पिढीला जे आरक्षण दिले होते. तेही कमी करत आणले परंतु तरी देखील पूर्ण आरक्षण हटवले नाही. त्यामुळे बांगलादेशी तरुणांचा संताप वाढला आणि त्यांनी बांगलादेशी केंद्र सरकार हाणून पाडले. या सर्व परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला.
असे म्हणतात शेख हसीना यांनी संपूर्ण बांगलादेशात आपल्या सत्तेचा नांगर फिरवत, विरोधकांना झेलबंद केले. म्हणून शेख हसीना यांना आपली सत्ता सोडावी लागली. त्यात आरक्षण विषयाची ठिणगी पडली, त्याचा फायदा घेऊन विरोधी विचाराच्या संघटनांनी, पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजत, बांगलादेशात अराजक माजवले. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांंनी नवबांगलादेशाची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांचे राजकारण धर्मनिरपेक्ष असल्यामुळे त्यांनी देशाची राज्यघटना सेक्युलर स्वरूपाची बनवली. त्यानंतर धर्मांध प्रवृत्तीच्या संघटनांनी, पक्षांनी शेख हसीना यांच्या वडिलांची राष्ट्रनीती हटवली त्यातच शेख मुजीबुर रहमान यांचा अंत झाला आणि बांगलादेशात फक्त इस्लामिक जनतेला महत्व दिले जाईल अशी विचारधारणा तयार केली गेली. त्यातून बांगलादेशात हिंदू बंगाली जनतेवर अन्याय, अत्याचार करण्यात आले. सन २००० नंतर ज्यावेळी शेख हसीना यांची सत्ता बांगलादेशात आली. त्यावेळी त्यांनी या सर्व धर्मनिष्ठ सनातनी मंडळीवर.कारवाई करत त्यांच्या दहशतवादी हालचालींवर प्रतिबंद घालत. त्या सर्वांना तुरुंगात डांबले आणि त्यांना निष्क्रिय केले. एवढेच. नव्हे तर प्रत्येक वेळी भारताची बाजू घेऊन आपल्या बांगलादेशतील दहशतवादी आरोपींंना वेळोवेळी भारताच्या ताब्यात दिले होते. या सर्व गोष्टीमुळे बांगलादेशात शेख हसीना यांच्या विरुद्ध वातावरण तापले. त्यामुळे आज मितीला बांगलादेशात अराजक माजले.
घडलेल्या या सर्व गोष्टी आपण सर्वांनी वाचल्या आहेत, ऐकल्या आहेत म्हणून त्यावर जस्त बोलण्याची आवश्यकता नाही. बांगलादेशाचे हे राजकारण आपल्याला येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्येही समजणार आहे. मात्र ही बांगलादेशाच्या अराजकतेची परिस्थिती भारतासाठी फार धोकादायक आहे. त्यामुळे आपल्या भारताला डोळ्यात तेल घालून बांगलादेशाकडे बारकाईने बघण्याची गरज निर्माण झाली आहे. बांगलादेश, पाकिस्तान हे देश कट्टर धर्मवादी आहेत. त्यांनी वेळोवेळी भारतामध्ये अशांती पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात हे दोन देश यशस्वी झालेले आहेत. याबाबतीत पाकिस्तान हा एक नंबरचा दहशतवादी कारवायांचा देश आहे. कश्मीर, पंजाब, राजस्थान आणि अरबी समुद्रातून मुंबई या प्रदेशांना त्यांनी नेहमी सतावले आहे. यात कश्मीर, पंजाब पाकिस्तानच्या रडारवर कायम राहिले आहे तसेच बांगलादेशी घुसखोरही आपल्या देशात येत असतात. अशावेळी भारताच्या अंतर्गत पोलीस व्यवस्थेला सतर्कता बळगावी लागते. काही भारतीय सुजान नागरिक, कार्यकर्ते यावेळी सतर्क राहुन पोलिसांना सहकार्य करतात. त्यामुळे बांगलादेशी आतंकवाद वेळेवर थोपवला जातो परंतु काही दहशतवादी कारवाया बांगलादेशामुळे झालेल्या आहेत. या सर्व गोष्टीचा विचार आपण भारत म्हणून केला पाहिजे.
आज शेख हसीना यांना बांगलादेशाने बाहेर काढले आहे. म्हणून मग बांगलादेशात लष्कराने हंगामी सरकार स्थापन केले आहे, तरी देखील बांगलादेशी युवक थंड झालेले नाहीत. त्यांची उग्र आंदोलने चालू आहेत. अशा परिस्थितीत हे सर्व लोक अधिक धर्मनिष्ठ, धर्मांध होऊन, भारताला सतावू शकतात. आता भारतात होणाऱ्या पाकिस्तानच्या कारवाया बंद झाल्या आहेत, तरी अधून मधून पाकिस्तान आपले डोके वर काढते. त्यात आता बांगलादेशची भर पडणार आहे. अशावेळी आपला दोन नंबरचा शत्रू देश चीन या दोन्ही देशांना मदत करू शकतो. यामागे लपून छपून अमेरिकाही असू शकते. अशा पार्श्वभूमीवर भारताला मोठ्या ताकदीने रणांगणात उतरावे लागेल. त्या आधी भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात आपला दबाव गट निर्माण केला पाहिजे. अमेरिका, युरोपशी सलगी करून त्यांना चर्चेत गुंतवून आपला बचाव केला पाहिजे. म्हणजे भारताला साम, दाम, दंड, भेद ही नीती वापरायला हवी. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचा मोठा धबधबा निर्माण केलेला आहे. जगभरातल्या दहा नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश त्यामुळे झालेला आहे. जागतिक पार्श्वभूमी बघून नरेंद्र मोदी यांनी कधी आक्रमक तर कधी शांततामय हिंदुत्व जगाला दाखवून दिले. म्हणून नरेंद्र मोदी म्हणतात, आमच्या भारत देशाला केवळ महासत्ता व्हायचे नाही, तर आम्हाला विश्वगुरू व्हायचे आहे. म्हणजे सर्व जगाला रामायण, महाभारत शिकवताना, भगवद्गीता सांगून, वापरून आम्ही नेमकेपणाने काय करू शकतो. हे जगाला दाखवून द्यायचे आहे. कारण गीता ही वाईट प्रवृत्तींचा विनाश करणारी आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आपण भारतीय म्हणून राहिले पाहिजे.
2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सत्ता भारतात प्रस्थापित केली आहे. दहा वर्षापासून ते मानवता आणि हिंदुत्व या धोरणाला अनुसरून चाललेले आहेत. त्यातून त्यांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. जगभरात आपल्या हिंदुत्वाचे वजन निर्माण केले आहे. त्यामुळे संपूर्ण जग भारताला मानते आहे. अशावेळी बाजूच्या बांगलादेशत अमानवी वातावरण तयार झाले आहे. अशा या वातावरणात शेख हसीना सुरक्षेसाठी भारतात येतात, ही भारताकरता गौरवाची गोष्ट आहे. आख्खे जग वाईट झाले, तरी भारत देश मानवतावादी राहणार व तो आपल्याला संरक्षण देणार ही खात्री शेख हसीना यांना आहे. म्हणून त्या भारतात आल्या आहेत. म्हणून भारताला आता गप्प बसून चालणार नाही. बांगलादेशामध्ये शांतता प्रस्थापित केली पाहिजे, लोकशाही राज्य मूळ पदाला येई पर्यंत भारताला यशस्वी प्रयत्न करायला हवेत. कारण हा भारताच्या जगण्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेजारचे दोन देश सक्रियपणे धर्मवेडे असून चालणार नाही. त्यांच्या अशा धर्मवेड्या प्रवृत्तीमुळे आपल्या भारताला मोठी हाणी पोचणार आहे. यामुळे बांगलादेश पुन्हा लोकशाहीत आणायला हवा.
बांगलादेशात ही अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यावर, भारतातही असे व्हायला हवे. असे दळभद्री विचार काही लोकांनी व्यक्त केले. असा विचार करणे योग्य नाही. बांगलादेशाने आरक्षणाच्या नावाखाली धर्मांधपणाही हट्टाने पेटवला आहे. आरक्षण आंदोलन म्हणता म्हणता त्यांना इस्लामिक राष्ट्राचा तोरा मिरवायचा आहे. म्हणून हे त्यांचे सर्व उपदव्याप सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींकडे आपण बांगलादेशी दहशतवाद म्हणून पाहिले पाहिजे.
आशा अराजकवादी परराष्ट्रीय परिस्थितीत भारतातील भाजपा विरोधी असलेल्या सर्व पक्षांनी बांगलादेशाच्या या मुद्द्यावर एकत्र आले पाहिजे. आणि भारतात अंतर्गत शांतता राखायला हवी. कारण आपल्या भारतातील काही सरफिरु धर्मांध लोक अशांतीचे मुद्दे शोधत इकडे तिकडे वावरत आहेत. त्यांना खतपाणी मिळवून देऊ नये. म्हणून सर्व विरोधी पक्षांनी, संघटनांनी एकोपा राखून तत्त्वनिष्ठतेने देशाचे राज्याचे राजकारण चालवले पाहिजे. यातूनच भारतात शांतता नांदू शकेल. ही वेळ वाद विवाद घालण्याची नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात सहभागी होण्याची गरज आहे. त्यातूनच सर्व जगाला मानवतावादी हिंदुत्व आणि संघर्षात्मक हिंदुत्व समजून येणार आहे. याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्व भारतीयांनी सहकार्य केले पाहिजे. तरच भारत सक्षम आंतरराष्ट्रीय राजकारण करू शकतो. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी याचा विचार करायला हवा. म्हणून भारतात हिंदुत्वाचे सरकार हवे आहे. हिंदुत्व नेहमी मानव धर्माचा विचार करून पुढे जाते.जय हिंद
ॲड. रुपेश पवार
९९३०८५२१६५