सावंतवाडी
तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी खाजगी डॉक्टर सारखे शेतकऱ्यांकडून दोन ते चार हजार रुपयांची मागणी करून गुरे तपासतात पैसे दिले नाही तर ही डॉक्टर मंडळी वेगवेगळी कारणे सांगून येण्याचे खातात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा आरोग्य आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.
आपाल्या जिल्ह्यातील सावंतवाडी येथे असलेले काही आपले पशुवैद्यकीय अधिकारी (उदा.डॉक्टर मळगांव, माडखोल) एखाद्या शेतकऱ्याच्या जनावराला कुठल्याही प्रकारचचा आजार असला की फोन लावला तर “मी आता इकडे आहे, तिकड़े आहे, ३० ते ४० कि.मी. चे अंतराचे निमित्त सांगतात”. ते शहरातच असतात. त्याची टाळाटाळ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बरेच शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्याचप्रमाणे काही डॉक्टर रु.४००/- पपासून सुरुवात करुन रु.२०००/- पर्यंत फी घेत आहेत. त्यामुळे ते सरकारी डॉक्टर आहेत की खाजगी डॉक्टर आहेत हेच समजत नाही. काही डॉक्टर माणुसकी सोडून वागत असल्याचा आरोप निवेदनातून केली आहे.
मळगाव येथील एक उदाहरण त्यांनी न आई निवेदनात दिले आहे .जनावरांना एक रोग आला आहे. त्या लसी मोफत असताना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. आपल्या जवळ पुरावे आहेत. तसेच बरीचशी जनावारे या तालुक्यातील मुजोर डॉक्टरांमुळे दगावली आहेत याची संपूर्ण चौकशी व्हावी. तसेच सर्व डॉक्टर चांगले काम करतात. उदा. जि.प.चे वेंगुर्ला पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई, सावंतवाडी, पशुधन विकास अधिकारी सुधाकर ठाकूर यांच्या सारखे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही आम्ही करतो. असे म्हटले आहे.
एखाद्या शेतकऱ्याच्या जनावराला कुठल्याही प्रकारचचा आजार असला की फोन लावला तर “मी आता इकडे आहे, तिकड़े आहे, ३० ते ४० कि.मी. चे अंतराचे निमित्त सांगतात”. ते शहरातच असतात. त्याची टाळाटाळ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे बरेच शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्याचप्रमाणे काही डॉक्टर रु.४००/- पपासून सुरुवात करुन रु.२०००/- पर्यंत फी घेत आहेत. त्यामुळे ते सरकारी डॉक्टर आहेत की खाजगी डॉक्टर आहेत हेच समजत नाही. काही डॉक्टर माणुसकी सोडून वागत आहेत. हल्ली मळगाव येथील एक उदाहरण देतो, जनावरांना एक रोग आला आहे. त्या लसी मोफत असताना शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात. माझ्या जवळ पुरावे आहेत. तसेच बरीचशी जूनावारे या तालुक्यातील मुजोर डॉक्टरांमुळे दवागली आहेत याची संपूर्ण चौकशी व्हावी. त्रस -सर्व डॉक्टर चांगले काम करतात. उदा. जि.प.चे वेंगुर्ला पशुधन विकास अधिकारी विद्यानंद देसाई, सावंतवाडी, पशुधन विकास अधिकारी सुधाकर ठाकूर यांच्या सारखे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कौतुकही आम्ही करतो.
आपण या मुजोर अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा गोरगरीब शेतकऱ्यांनी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पाळलेल्या पाळीव जनावरांचा जीव धोक्यात येणारा आहे. तरी आपण अशा डॉक्टरांना आपल्या कार्यालयात, गाडीवर व टी शर्टवर रु.४०० ते रु.२०००/- चे दरपत्रका लावणेचे आदेश द्यावेत ही कळकळीची विनंती.
माझ्या या निवेदन अर्जावर त्वरीत कार्यवाही न झाल्यास शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मा.उपविभागीय अधिकारी (महसुल) यांचे कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह उपोषणास बसावे लागेल. आफल्या या उपोषणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.