You are currently viewing वसोली गावात शुक्रवारी २३ ऑगस्टला रानभाजी महोत्सव २०२४

वसोली गावात शुक्रवारी २३ ऑगस्टला रानभाजी महोत्सव २०२४

कुडाळ :

 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा सिंधुदुर्ग,तालुका कृषी अधिकारी कुडाळ व ग्रामपंचायत वसोली यांच्या संयुक्त विद्यमाने वसोली हायस्कूल येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवारी २३ ऑगस्टला सकाळी १० वाजता या महोत्सवास प्रारंभ होणार आहे.

या महोत्सवात विविध रानभाज्या व औषधी वनस्पती प्रदर्शनात मांडण्यात येणार असून रानभाज्यांपासून बनविलेल्या विविध प्रक्रिया व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. तसेच महोत्सवादरम्यान रानभाज्यांचे आहारातील महत्त्व व त्यांचे लागवड तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत व प्रकल्प संचालक आत्मा सिंधुदुर्गच्या भाग्यश्री नाईकनवरे हे मार्गदर्शन करणार आहे. तरी शेतकऱ्यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुडाळ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा