*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वी देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*
गण गण गणात बोते ll जय गजानन ll
*काव्यपुष्प – ५९*
अध्याय – १० वा, कविता – ५ वी
—————————————–
बंकटलालाने समजावले l ते सर्वांना पटले l एकमताने पुढे ठरले l मठ बांधण्याचे ll १ ll
भास्कर , बाळाभाऊ ,पितांबर सोबती l रामचंद्र गुरव,
गणेशअप्पा गाव याचे उमरावती l तत्पर सेवेत हे चौघे सेवेत स्वामींच्या ll २ ll
आली होती बाळाभाऊस विरक्ती l म्हणून वेगळी त्याची वृत्ती l केली त्यास भास्कराने सक्ती l भाषा त्याची अहंकाराची ll ३ ll
भास्कराचे हे वागणे पाहिले l स्वामींना नाही ते आवडले l
त्यांनी मग एक केले l भास्करास उमजण्यासाठी ll४ ll
बाळा भाऊला स्वामी मारती l छत्रीने, काठीने झोडीती l
मग त्यास तुडविती l माती जैसा ll ५ ll
पाहून सारे भयभीत होती l बंकटा, कृष्णाजीला बोलाविती l
दोघे स्वामींना विनविती l नका मारू भक्त भास्कराला ll६ll
ऐकून समर्थ हसले l म्हणे,ऐसे काही नाही झाले l
मग,बाळाभाऊस म्हणाले l बाळा, दाखिव रे सर्वांना ll७ll
सर्वांनी बाळा भाऊस पाहिले l त्यास काही नव्हते झाले l
तेव्हा खरे काय ते भास्करा कळाले l भक्त बाळाभाऊ खरा ll८ ll
—————————————
करी क्रमशः लेखन कवी अरुणदास
—————————————–
कवी – अरुणदास, अरुण वि. देशपांडे – पुणे
—————————————–
,