*शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात मुदतबाह्य औषधांचा केला वापर..?*
*गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ..?*
शिरोडा
सरकारी रुग्णालय म्हणजे गोरगरीब रुग्णांसाठी जीवनदायीनी. पावसाळ्यात अनेक साथीचे रोग फैलावत असल्याने सरकारी रुग्णालयातून त्यावर खात्रीशीर इलाज होतो असा सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांचा विश्वास आहे आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने गोरगरीब रुग्ण सरकारी रुग्णालयाचा आधार घेतात. अशावेळी रुग्णालय प्रशासनाकडून वापरण्यात येणारी औषधे योग्य असल्याची खात्री करणे आवश्यक असते. परंतु वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातून एका रुग्णावर उपचार करताना सोडियम क्लोराइड इंजेक्शन (सलाईन)चा वापर केला गेला ते फेब्रुवारी 2024 मध्ये मुदत संपलेलं असल्याचे निदर्शनास आले आहे. सरकारी वापरासाठी अशी नोंद असलेल्या सदर इंजेक्शनवर मार्च 2022 अशी उत्पादन तारीख असून फेब्रुवारी 2024 ही मुदतपूर्तीची तारीख असल्याचे दिसते.
ज्या सरकारी रुग्णालयांवर गोरगरीब रुग्ण अवलंबून असतात अशा जबाबदार रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे होणारी बेपर्वाई म्हणजे गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. एखादा खाण्याचा पदार्थ देखील बाजारात घेताना सर्रास आजकाल सर्व त्याची एक्सपायरी तारीख पाहून घेतात कारण ते पोटात जाणार असतं, मग रुग्णाच्या शरीरात डायरेक्ट जाणाऱ्या इंजेक्शनची तारीख जबाबदार कर्मचाऱ्यांनी कशी काय पाहिली नाही? गोरगरीब रुग्णाच्या जीवाची काही किंमतच नाही असा रुग्णालयातील सरकारी कर्मचाऱ्यांचा समज आहे का? या उपजिल्हा रुग्णालयाला दोन वर्षांपूर्वीच्या औषधांचा पुरवठा केला गेला आहे का? असे अनेक प्रश्न सदरचा बेजबाबदार प्रकार घडल्यानंतर उपस्थित होत आहेत. प्रशासनाने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित बेजबाबदार दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
_____________________________
*संवाद मीडिया*
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*
*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*
*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*
*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*
*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*
*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*
*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*
*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*
*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*
*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*
*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*
*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*
*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*
*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*
*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*
*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*
*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*
*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*
*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*
*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
*📲 7350 7350 91/ 7350 534 534*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/145723/
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*