– सचिव डॉ. शिवलींग पटवे
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.१२ वी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे saral database वरुन नियमित शुल्कासह ऑनलाईन पध्दतीने १५ डिसेंबर २०२० ते ०४ जानेवारी २०१ सर कालावधीत भरायाची होती सदर आवेदनपत्रे भरण्यास मुदतवाढ देण्यात येत असून सदर मुदतवाढीच्या तारखा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत सदर आवेदन पत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर भरावयाची आहेत. अशी माहीती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिली .
उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र,कला व वाणिज्य शाखाची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे saral database वरुन ऑनलाईन पध्दीतीने भरावयाची तारखा मंगळवार दिनांक ५ जानेवारी २०२१ ते १८ जानेवारी २०२१ उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यायामार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी hsc vocational Stream पुनर्परिक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी private Repeater श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याची ITI औद्यगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Tranfer oF Credit घेणारे विद्यार्थी आवेदन पत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन भरावयाच्या तारंखा मंगळवार दिनांक ५ जानेवारी २०२१ ते सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन Downlod भरुन चलनाव्दारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा मंगळवार दिनांक १५ जानेवारी २०२१ ते सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर कॉलेज Login मधून PRE-LIST उपलब्ध करुन दिलेली असेल कनिष्ठ महाविद्यायांनी त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यामार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरच्या माहितीनुसार त्य पडताळून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत PRE-LIST वर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी .त्यानंतर सदर PRE-LIST चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी. उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांची याद्या व PRE-LIST जमा करावयाची तारीख गुरुवार दि 28 जानेवारी 2021 राहील अशी माहीती कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ. शिवलिंग पटवे यांनी दिली .