You are currently viewing मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करा,टारगेट करून टीका नको

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करा,टारगेट करून टीका नको

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करा,टारगेट करून टीका नको

*आमदार नितेश राणे यांनी मित्र पक्षातील टीकाकारांना सुनावले

*मंत्री चव्हाण यांच्यासारखे काम इतरही कॅबिनेट मंत्र्यांना करता आले असते

* मुख्यमंत्री शिंदे यांच्या उठावाला न्याय द्यायचा असेल तर महायुतीची वज्रमुठ अभेद्य ठेवा

कणकवली

मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक झाले पाहिजे.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम हे त्यांच्या खात्यात येत नसताना सुद्धा ते नैतिक जबाबदारी स्वीकारून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यांना टारगेट करून टीका करणे नैतिकतेला धरून नाही. अशी टीका आम्ही कधीही सहन करणार नाही अशा शब्दात भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी सुनावले. कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री रवींद्रजी चव्हाण हे प्रामाणिकपणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला हा प्रकल्प मार्गी लागावा,यासाठी स्वतःचे खाते नसतानाही मंत्री रवींद्र जी चव्हाण हे रस्त्यावर उतरून,कामाची पाहणी करून, अधिकाऱ्यांना घेवून हा मार्ग कोकणी जनतेसाठी,कोकणी माणूस म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत आहे. अशा व्यक्तीचे कौतुक केले पाहिजे होते. मात्र तुम्ही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता, त्यांच्यावर टीका करता. भारतीय जनता पार्टी म्हणून अशी टीका आम्ही सहन करणार नाही. आणि का म्हणून सहन करावी असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केला.
कोकणातील ग्रामपंचायत पासून खासदारकी पर्यंत प्रत्येक निवडणुकीत महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सहकार्य शिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही. अडीअडचणीच्या काळात रवींद्र चव्हाण साहेबांचीच मदत तुम्ही घेता आणि त्यांच्यावरच टीका करता, तेव्हा त्यांना राग येणे सहाजिकच आहे. महाविकास आघाडी हा महायुतीतील सर्वच पक्षांचा राजकीय शत्रू आहे हे लक्षात ठेवा. शिंदे साहेबांनी उठाव केला त्याला न्याय द्यायचा असेल तर महायुती अभेद्य आणि ताकतीने एकत्र राहिले पाहिजे. कोकणी जनतेने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीलाच कौल दिलेला आहे. त्यामुळे एक संघ काम केल्यास अधिक फायदा महा युतीचाच होईल. महामार्ग चौपदरीकरणाचे काम जसे सिंधुदुर्गात पूर्ण झाले त्याच पद्धतीने रत्नागिरी ते पूर्ण होणार आहे. त्यासाठी जनतेने खासदार नारायण राणे यांना निवडून दिले आहे.त्यांनी रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मीटिंग केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा दिल्लीत मंत्र महोदयांशी बोललेले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर अशा पद्धतीने एक संघ काम सुरू असताना स्थानिक पातळीवर अशी भूमिका घेणे नैतिकतेला धरून नाही. असेही नितेश राणे यांनी सुनावले.
जो काम करतो त्याच्यावरच टीका करू नका. अनेक कॅबिनेट मंत्री आहेत मात्र त्यांनी अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेले नाहीत. मात्र रवींद्र चव्हाण हे रस्त्यावर उतरले आणि हे काम पूर्ण होण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशा नेत्याचे त्याच्या कामाचे प्रामाणिकपणाचे कौतुक झाले पाहिजे. त्यांना टार्गेट करणे आणि टारगेट करून टीका करणे हे नैतिकतेला धरून नाही असे शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले.

प्रतिक्रिया व्यक्त करा