You are currently viewing उज्जैनकर फाउंडेशन शाखा बुलढाणा जिल्हा वतीने समशेरशिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेत साहित्य वाटप..

उज्जैनकर फाउंडेशन शाखा बुलढाणा जिल्हा वतीने समशेरशिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेत साहित्य वाटप..

चिखली:

चिखली येथून जवळच असलेल्या मौजे वरदडा येथे आज दिनांक २० आगस्ट २०२४ रोजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवन आवश्यक साहित्य तथा फराळाचे वाटप, शिवचरण उज्जैनकर चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष डॉ. पंढरीनाथ शेळके यांचे अध्यक्षतेखाली, मौजे वरदडा ता. चिखली येथे, उज्जैनकर फाउंडेशनच्या बुलढाणा जिल्हा शाखा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार राज्य कोषाध्यक्ष कवी रामदास कोरडे, कवयित्री डॉ मंजूराजे जाधव बुलढाणा, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री गोपाल जाधव ,फाउंडेशनचे श्री सूर्यवंशी साहेब, जिल्हा संघटक श्री भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जऊरकर सर, शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री युवराज पवार त्यांचे धर्मपत्नी सौ रत्नाताई पवार, मा.सरपंच समाधान आकाळ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. उज्जैनकर फाउंडेशन बुलढाणा जिल्हा शाखेच्या च्या वतीने आज या ठिकाणी शाहीर मनोहर पवार यांच्याकडून शंभर मुलांना पाटी पुस्तक, डॉ. मंजूराजे जाधव बुलढाणा त्यांच्याकडून सर्व शाळेतील मुला मुलींना राखी बांधण्यात आली. व मुलांना बनियन आणि पॅड दिले. श्री भगवान पाटील चिखली व गाडगेबाबा यांचे नातू यांच्या वतीने प्रत्येक मुलांना टॉवेल भेट देण्यात आली. साहितकार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पंढरीनाथ शेळके यांनी कार्यक्रमात मुलांना खाऊ देण्यात आला. साहित्य वाटप मान्यवरांचे हस्ते झाले. या प्रसंगी रामदास कोरडे, डॉ.मंजु राजे जाधव बुलढाणा यांनी मार्गदर्शन व कविता सादर केली.

बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे हे उद्दिष्टे व कार्य याबाबत माहिती प्रास्ताविकातून दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.पंढरीनाथ शेळके यांनी शिवचरण फाउंडेशन मुक्ताईनगर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जेनकर यांनी सामाजिक, साहित्यिक आणि लोककलेच्या कार्यासाठी शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन ची स्थापना करून आज संपूर्ण भारतभर उज्जैनकर फाउंडेशन समाज हिताची कार्य करीत आहे. त्यातीलच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने उपेक्षित गरजू समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विविध साहित्याची मदत केली फाऊंडेशन दरवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवर साहित्य संमेलन घेवून मराठी भाषा संवर्धन करते समाजातील गुणवान कर्तबगार व्यक्तीचे पुरस्कार देवून सन्मान करते,विविध समाज हिताचे उपक्रम राबवित आहे. त्यातील एक उपक्रम आज जिल्हा शाखेने येथे राबविला आहे.असे मार्गदर्शनात नमूद करून मुलांनी शिक्षण घेवून मोठे व्हावे,आणि परिस्थिवर मात करावी अशी आशा व्यक्त करून युवराज पवार यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री गोपाळराव जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री युवराज पवार यांनी केले. मुलांना साहित्य व खाऊ वाटप करून शेवटी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा