*माडखोल येथील बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचा निकाल 91%*.
सावंतवाडी
व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल तालुका सावंतवाडी येथील बी फार्मसी पदवी अंतिम वर्षाचा निकाल 91% लागला आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखुन नेत्रदीपक कामगिरी केली. शैक्षणिक वर्ष 2023/24 मधील अंतिम वर्षातील प्रथम क्रमांक – कुमार बिरूदेव सरगर (8.64 SGPA) द्वितीय क्रमांक – कुमारी ऋतुजा चव्हाण आणि कुमार – श्रेयस कदम (8.36SGPA) तृतीय क्रमांक कुमारी शाभंवी अणसुरकर (8.27%SGPA) यांनी पटकाविला. अंतिम वर्षातील एकुण 120 पैकी 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी 57 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी तर 52 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्या बद्द्ल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील व महाविद्यालयीन प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले