*माजी मंत्री रामदास कदम यांच्या आक्षेपार्ह विधानाचा विशाल परब यांनी केला निषेध*
*रविंद्र चव्हाण आमचे नेते; आक्षेपार्ह विधान नाही सहन करणार*
*युवा नेते विशाल परब यांची सावंतवाडीत भरगच्च पत्रकार परिषद*
सावंतवाडी
शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल एकेरी शब्दात आक्षेपार्ह विधान केल्याने महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
सावंतवाडीतील जनसंपर्क कार्यालयात विशाल परब यांची पत्रकार परिषद झाली.
माजी मंत्री रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गाचे निमित्त करून खालच्या पातळीवरील टीका केली होती. वास्तविक पाहता मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न गेली १४ वर्षे प्रलंबित आहे, हे स्वतःच रामदास कदम मान्य करतात मात्र तरीही गेले दोन वर्षे अतिशय चांगल्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ते औकात, लायकी अशा शब्दात बोलत आहेत. केवळ आपला वैयक्तिक राग आणि द्वेष उगाळण्यासाठी महायुतीचा बळी गेला तरी त्याना त्याची पर्वा दिसत नाही. रवींद्र चव्हाण हे कार्यसम्राट कॅबिनेट मंत्री आणि आमचे दिपस्तंभासम नेते आहेत त्यांच्याविषयी रामदास कदम यांनी अरे तुरे च्या भाषेत बोलणे हे कदापि सहन करण्याच्या पलीकडचे आहे.रामदास कदम यांनी कोणाकडून तरी युती तोडण्याची सुपारी घेतलेली असावी.
शांतपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि क्रांतिकारी निर्णय घेत पूर्ण महाराष्ट्र झपाट्याने बदलून दाखवत असलेले रविंद्रजी चव्हाण आमचे सर्वेसर्वा आहेत, प्रेरणास्थान आहेत. आमचे नेते रविंद्र चव्हाण जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी अंतिम राहणार आहे. आम्ही रामदास कदम यांच्यासारख्या बेबंद राजकीय प्रवृत्तीचा निषेध करत आहोत, असे भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब म्हणाले.
यावेळी सावंतवाडी पालिकेचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, सावंतवाडी भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, दिलीप भालेकर, साईनाथ जामदार – शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष अमित गवळडकर, नागेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
_____________________________
*संवाद मीडिया*
*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*
*🔸अंदमान – 5 दि – 33,990/-*
*🔹छत्तीसगड – 5 दि – 24,990/-*
*🔸हिमाचल – शिमला मनाली चंदीगड – 7 दि – 28,990/-*
*🔹काश्मीर वैष्णोदेवी – 6 दि – 32,990/-*
*🔸लेह लडाख – 7 दि – 39,990/-*
*🔹नैनिताल मसुरी कोरबेट – 6 दि – 33,990/-*
*🔸अमृतसर – 4 दि – 17,990/-*
*🔹पांडेचेरी कांचीपुरम महाबलीपुरम – 5 दि – 31,990/-*
*🔸हैदराबाद रामोजी फिल्म सिटी – 5 दि – 32,990/-*
*🔹केरळ कन्याकुमारी – 6 दि – 24,990/-*
*🔸इंदोर उज्जैन मांडू – 4 दि – 25,990/-*
*🔹राजस्थान – मेवाड मारवाड – 7 दि – 28,990/-*
*🔸दिल्ली आग्रा – 4 दि – 20,990/-*
*🔹चार धाम – 13 दि – 71,990/-*
*🔸अहमदाबाद वडोदरा स्टॅच्यू ऑफ युनिटी – 5 दि – 22,990/-*
*🔹हम्पी बदामी – 5 दि – 26,990/-*
*🔸अष्टविनायक यात्रा – 3 दि – 11,990/-*
*🔹ओरिसा – 5 दि – 28,990/-*
*🔸सिक्कीम दार्जिलिंग – 7 दि – 39,990/-*
*जीएसटी आणि टीसीएस अतिरिक्त*
*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*
*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆
*📲 7350 7350 91/ 7350 534 534*
*जाहिरात
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*