You are currently viewing एक धागा रेशमाचा (अष्टाक्षरी)

एक धागा रेशमाचा (अष्टाक्षरी)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य जेष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम कविता*

 

*एक धागा रेशमाचा* (अष्टाक्षरी)

 

दिन रक्षाबंधनाचा
धागा असे संकेताचा
बंधू भगिनी प्रेमाचा
एकमेका रक्षणाचा

सांगे भगिनी भावाला
दीर्घायुष्य तुज मिळो
कीर्ती तुझी दिगंतरी
इडा पिडा सारी जळो

मान ठेव या सूत्राचा
एक धागा प्रतीकाचा
प्रेम माया विश्वासाचा
नात्यातल्या वचनाचा

नसे जरी मी अबला
स्वरक्षणा मी समर्थ
तरी पाठ राख माझी
होता काळाचा अनर्थ

प्रतिनिधी तू धाग्याचा
जागवेल पुरुषार्थ
धावशील रक्षणार्थ
हाच राखीचा शब्दार्थ..

 

*राधिका भांडारकर*

*पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा