You are currently viewing “ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा!” – नितीन चंदनशिवे

“ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा!” – नितीन चंदनशिवे

*”ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा!” – नितीन चंदनशिवे*

पिंपरी

“ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा!” असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी क्लब हाऊस, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वाकड येथे रविवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी व्यक्त केले. सेवानिवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार आणि कवी कै. रा. ना. तथा दिनेश रोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्यजागर पुरस्कार स्वीकारता नितीन चंदनशिवे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, डॉ. अतुल रोडे, छायादेवी रोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

नितीन चंदनशिवे पुढे म्हणाले की, “आईच्या कवितेत बापाची जागा शोधायची असते. कोणत्याही क्षणी बाप आपल्याला फोन करतो, यासारखी जगात दुसरी आनंददायी गोष्ट नाही. कविता कवीला पैसे देतेच असे नाही; पण अपार समाधान देते. एका समर्पित कवीचे आशीर्वाद म्हणजे हा पुरस्कार आहे!” याप्रसंगी आय. के. शेख, शामराव सरकाळे, जयंती रोडे-बनकर, डॉ. अशोक लांडगे यांनी कविता सादर केल्या; तर शुभांगी शिंदे, गणेश ढगे, नितीन बनकर, कल्पना रोडे-कोल्हे यांनी मनोगते व्यक्त केलीत. अंबादास रोडे यांनी प्रास्ताविकातून दिनेश रोडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर भाष्य करीत हृद्य आठवणींना उजाळा दिला. सुरेश कंक यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “वास्तव अनुभव मांडणार्‍या कविता काळजाला हेलावून टाकतात!” असे मत मांडले.

दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पृथ्वीराज रोडे, धनंजय रोडे, सत्यम रोडे, सुप्रिया ढगे, भक्ती रोडे, डॉ. विकास शेटे आणि रोडे परिवार यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल रोडे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

______________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी

*•ELECTRICIAN 2 Years*

*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*

*•WIREMAN 2 Years*

*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*

*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगांव स्टेट हायवे लगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
👉अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय
👉अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा
👉माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

Email ID-vpcpm2017@gmail.com

Website-www.vpcpm.org
https://kokansadlive.com/kokan/admission-open-entry-begins/11932

*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*

*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा