You are currently viewing संतवाड्मय तरुण पिढीला रुचेल असे सांगण्याची गरज. डाॅ. सौ. स्वाती शिरडकरांचे प्रतिपादन

संतवाड्मय तरुण पिढीला रुचेल असे सांगण्याची गरज. डाॅ. सौ. स्वाती शिरडकरांचे प्रतिपादन

*संतवाड्मय तरुण पिढीला रुचेल असे सांगण्याची गरज.
डाॅ. सौ. स्वाती शिरडकरांचे प्रतिपादन.*

वैभववाडी

विश्ववंदिता भारताच्या निर्माणासाठी संतांचे वाङ्ममय हे अत्यंत प्रभावी असून ते आजच्या तरूणाईला समजेल, रूचेल अशा पद्घतीने सांगण्याची गरज आहे असे प्रतिपादन श्री.रामचंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठाता डाॅ. सौ.स्वाती शिरडकर यांनी केले.
दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशनच्या कोअर कमिटीतील सदस्यांची बैठक समर्थ सदन, छत्रपती संभाजी नगर येथे दि.१७ व १८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना डाॅ . शिरडकर बोलत होत्या.
संताचे साहित्य आणि आधुनिक विज्ञानातील अनेक संदर्भ देऊन त्यांनी आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याची गरज विशद केली.
दासबोध सखोल अभ्यास हा उपक्रम चाळीस वर्षांपासून कार्यरत असून देशातील नऊ राज्ये व जगातील सहा देशांमध्ये साधक अभ्यास करीत आहेत ही गौरवाची बाब असल्याचे प्रशंसोद्गार सौ. स्वाती शिरडकर यांनी यावेळी काढले.
दा.स.अ. फाऊंडेशनचे कार्य अजून व्यापक व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे संचालक डाॅ. विजय लाड यांनी या कोअर कमिटीचे नियोजन केले असून प्रचार, प्रसार, ग्रंथ छपाई व प्रकाशन, निधी संकलन व विनियोग, अभ्यार्थींची प्रवेश प्रक्रिया आणि उपक्रमाचे डिजिटलायजेशन तसेच संकेत स्थळाचे लोकार्पण यासाठी देशातील बारा ज्येष्ठ कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
सौ. विनया व विनायक विद्वांस, सौ. वृंदा व आनंद जोगळेकर, सौ.अपर्णा वांगीकर, सौ. शुभदा व विवेक थिटे (पुणे), सौ. रंजना पाटील (बेळगाव), सौ. मेधा कुळकर्णी (धाराशिव), अनिल वाकणकर (वडोदरा), संतोष सप्रे (मुंबई), सौ. माधवी पानसे (नांदेड) या सर्व सदस्यांनी दा.स.अ. कोअर कमिटीच्या पहिल्या बैठकीत सक्रीय सहभाग घेतला.
समर्थ रामदास स्वामींचे वाङ्ममय हे मानवी जीवनातील प्रपंच व परमार्थाचा सुमधुर समन्वय साधणारे असून समाज व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या साहित्याचा संशोधक पद्धतीने सखोल व शिस्तबद्ध अभ्यास होण्यासाठी दा.स.अ. फाउंडेशन करीत असलेले कार्य अधिक व्यापक होईल अशी अपेक्षा डाॅ. विजय लाड यांनी यावेळी व्यक्त केली.
बैठकीची सुरुवात सीमाताई रिसबुड यांचे हस्ते दा.स.अ. उपक्रमाच्या संयोजक पू. अक्कास्वामी वेलणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली तर समारोप कल्याणकरी प्रार्थनेने झाला.

_____________________________
*संवाद मीडिया*

🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗🚕

माई ह्युंदाई सिंधुदुर्गात सुरु झालाय
*श्रावण महोत्सव*

*श्रावण स्पेशल ऑफर्स*

_ह्युंदाईच्या विशाल श्रेणीतील सीएनजी ऑरा, एक्सटर आणि निओस वर मिळेल_

*इन्शुरन्स एकदम फ्री*

*आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आजच कॉल करा* 📲

माई ह्युंदाई कुडाळ
उद्यमनगर
*संपर्क:* 7410006037

माई ह्युंदाई कणकवली
वृक्षवल्ली नर्सरी वागदे

*संपर्क:* 8956130166

_माई ह्युंदाई कुडाळ आणि कणकवली येथे आता सुसज्ज आणि अद्ययावत *वर्कशॉप*_

_आता मुंबई, गोवा,कोल्हापूरला जायची गरज नाही, कुडाळ माई ह्युंडामध्ये आपल्या सेवेसाठी अत्याधुनिक *बॉडी शॉप* सेवा सुरु आहे !_🚕🚗

*माई ह्युंदाई अविरत सेवेची पंचवीस वर्ष ….*

*जाहिरात*
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा