You are currently viewing सुंदरवाडीचे युवा नेतृत्व सच्चिदानंद उर्फ संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन.

सुंदरवाडीचे युवा नेतृत्व सच्चिदानंद उर्फ संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन.

*सुंदरवाडीचे युवा नेतृत्व सच्चिदानंद उर्फ संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन…*

सुंदरवाडीचे युवा नेतृत्व माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.संजू परब यांचा आज ५१ वा वाढदिवस. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खास. नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन संजू परब राजकारणात आले. निलेश राणे यांच्या मर्जीतले म्हणूनही त्यांची आजही जिल्ह्यात विशेष ओळख आहे. मा.खासदार निलेश राणे यांनी आपल्या घरातील सदस्य म्हणून देखील त्यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे संजू परब यांना कार्यकर्त्यांमध्ये देखील मानाचे स्थान आहे.
राजकारणात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या मनात स्थान मिळत नाही, परंतु संजू यांना केवळ कार्यकर्त्यांच्या मनातच नव्हे तर जनतेच्या मनात आदराचे स्थान आहे आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. अलीकडेच सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरण लोकार्पण कार्यक्रमात पक्षातील दिग्गज मानले जाणारे लोकप्रतिनिधी उपस्थित असताना देखील कार्यकर्ते आपल्या समस्या घेऊन संजू परब यांना गराडा घालून उभे असल्याचे दिसले. यावरून संजू परब यांची कार्यकर्त्यांच्या मनात असलेली प्रतिमा आणि विश्वासाचे दर्शन घडते.
साडेचार वर्षांपूर्वी सावंतवाडीतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत २३ वर्षे सावंतवाडी नगरपलिकेतील दीपक केसरकर यांची निर्विवाद असलेली सत्ता उलथवून अनपेक्षितरीत्या संजू परब सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले होते. तेव्हा पासून ते सर्वांच्या नजरेत आले. त्या पूर्वीच नगरपालिका निवडणुकीत आपले आठ नगरसेवक निवडून आणून त्यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली होती. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र सर्वच आघाडींवर श्रेष्ठ ठरत त्यांनी विजय अक्षरशः खेचून आणला होता. त्यांच्या विजयामुळे सावंतवाडी नगरपालिकेत प्रथमच नारायण राणे, नितेश राणे यांनी सत्ता आली आणि गेली कित्येक वर्षे सावंतवाडीवर सत्ता मिळविण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न साकार झाले होते, त्यामुळे सावंतवाडीचा भावी आमदार म्हणून त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
संजू परब हे सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेले नेतृत्व आहे. कुटुंबातील सर्वच व्यक्ती उच्चशिक्षित असल्याने एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबाचा वारसा त्यांना लाभलेला आहे. गोरगरिबांचा कळवळा असलेले संजू परब संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. संजू परब मदत करताना पक्षाकडून अथवा वरिष्ठ पातळीवरून मदत येईल यासाठी कधीही वाट पाहत थांबत नाहीत, स्वखर्चाने गरजूंना मदत करून त्यांच्या समस्या मार्गी लावतात. त्यामुळेच अनेक लोक मोठ्या आशेने त्यांच्याकडे मदतीसाठी येतात. सरकारी दफ्तरातील कामे असो वा इतर शासकीय कामे स्वतः लक्ष देऊन ते लोकांना सहकार्य करतात. त्यामुळेच संजू परब यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. संजू परब यांच्या दिलदार वृत्तीमुळे त्यांचा मित्रपरिवार सुद्धा मोठा आहे.
सावंतवाडीच्या या युवा नेतृत्वाचा आज ५१ वा वाढदिवस…. *संवाद मिडियाकडून संजू परब यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सदिच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा