कोलकत्ता मेडिकल कॉलेजच्या महिला डॉक्टरांवर झालेल्या घटनेचा कणकवलीत निषेध
डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली आणि आम्हीं कणकवलीकराणी केली प्रांताकडे कारवाईची मागणी
कणकवली
कोलकत्ता मेडिकल कॉलेज मधील महिला डॉक्टरांवर झालेल्या बलात्कार व क्रूर हत्येचा जाहिर निषेध आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी आज डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने कळ्या फित बाधून कणकवली पटवर्धन चौक येथून प्रांत कार्यालयापर्यंत मुकमोर्चा रॅली काढून निषेध करण्यात आला.
यावेळी कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांना दोशींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली आणि आम्ही कणकवलीकर यांच्या वतीने निवेदन देवून करण्यात आली.
डॉक्टर्स फ्रायडे क्लब कणकवली डॉक्टर क्लबचे विद्याधर तायशेटे, डॉक्टर संदीप नाटेकर, सेक्रेटरी डॉक्टर विनय शिरोडकर, ,डॉ.नितीन शेटये,डॉक्टर प्रवीण बिरमोळे, डॉक्टर एस. एम. ताईशेटे, आम्ही कणकवलीकरचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री ,डॉक्टर दादासो आबदार , डॉक्टर प्रतिमा नाटेकर, डॉक्टर शमिता बिरमोळे, डॉक्टर हेमा तायशेटे, डॉक्टर वर्षा सावंत,डॉक्टर प्राजक्ता तेली , डॉक्टर मीनल आपटे, अमिता कुलकर्णी , डॉ.रश्मी पेंढुरकर, डॉक्टर दिपाली वळजू , डॉक्टर संतोष राणे, डॉक्टर नीता कारंडे, शैला मुखरे, श्रद्धा कदम, पूजा सावंत, सह उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक देठे,, दाजी सावंत, मंगेश बावदाने, आदी उपस्थीत होते.