एलसीबीची धडक कारवाई;एकाला अटक
कणकवली
तालुक्यातील वारगाव येथे गांजाविक्री करणाऱ्याला एलसीबी शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून ७२६ ग्रॅम गांजासह रोख रक्कम असा ३० हजार १०० रुवयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. वारगाव रोडयेवादी येथील आरोपी प्रवीण आत्माराम गुरव ( वय ५० ) याला ताब्यात घेतले आहे. जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा विडा जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी उचलला आहे. कणकवली तालुक्यातील वारगाव येथे गांजा विक्री होत असल्याची टीप एलसीबी ला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या सूचनेनुसार एलसीबी उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वारगाव रोडयेवाडी येथे छापा टाकला. छाप्यात वारगाव रोडयेवाडीतील प्रवीण आत्माराम गुरव (वय ५० ) याच्या ताब्यातील प्लास्टिक पिशवीत एकूण ७२६ ग्रॅम वजनाचा ओला गांजा सापडून आला. प्रवीण गुरव याच्या ताब्यातील २९ हजार ४० रुपयांच्या गांज्यासह ५०० रुपये किंमतीचा वजन काटा आणि रोख रु.५६० रु असा एकूण ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत एलसीबी पीएसआय शाहू देसाई, एएसआय रामचंद्र बाबुराव शेळके, हवालदार जि बी कोयंडे, पोलीस नाईक प्रमोद काळसेकर, पी एस कदम, कृष्णा केसरकर, पोलीस कॉन्स्टेबल डी ए कांदळगावकर, एस एस खाडये, आर एम इंगळे, सी आर पालकर, सी एस नार्वेकर यांच्या पथकाने मंगळवार ५ जानेवारी रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी ही कारवाई केली. एलसीबी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी प्रवीण गुरव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.