*ज्येष्ठ साहित्यिका चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*🐣🕊️पांखरू🐥🕊️*
पक्षी जाय दिगंतरा
उडे उंच उंच अंबरा,
पंखी बळ येता जरा,
पांखरू सोडून जाई कोटरा।
🕊️☁️
चारा आणे माय चोचीतून
बांधी काडी काडी जमवून,
मऊ कापसाची गादी अंथरून,
पिल्लू निजवे मायेच्या उबेतून।
🐣🐥
दाणापाणी शोधण्या भुणभुण,
भटकून गोळा करे कणकण,
उन्हातान्हात उपाशी वणवण,
पिल्लांना भरवे दाणा कणकण।
🦆🕊️
घरट्यात सुरक्षित पिल्ले पाहून,
शांत झोपे बाळे कुशीत घेऊन, मोठी पांखरे घेतील सांभाळून,
माय लावे आशा उराशी जपून।
🕊️🕊️
मायाममतेचे जाळे ठेवले विणून,
लावी पिल्ला, जीव ओवाळून,
न कळले तिजला पंखी बळ येऊन,
घरट्यातून पांखरू गेले उडून
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई, विरार