You are currently viewing “संगीताचार्य हनुमान”

“संगीताचार्य हनुमान”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“संगीताचार्य हनुमान“*

 

गायनाचार्य आहेत श्री हनुमान

संगीत क्षेत्रातील सर्वोच्च स्थान।। धृ।।

 

हनुमान संहिता आहे अति प्राचीन

विविध अलंकार शोधले मारूतीनं ।।1।।

 

भद्र ग्रीव प्रकाश संधिप्रच्छादन

भाल बिंदू उद्वाहित रचिले कपिनं।।2।।

 

संगीत पारिजात ग्रंथ केला निर्माण

प्रवर्तक शार्दुल काहल हनुमान।।3।।

 

मांडीले त्यानं ताल मान कुशलतेनं

रसिकांना देई आनंद हनुमान।।4।।

 

ऐकिवात आहे हनुमदीय कीर्तन

गायीला लंका दहन सारंग कपिनं।।5।।

 

गायन निर्मिती झाली सामवेदांतून

शास्त्रीय संगीत कपिचे विश्वाला देन।।6।

 

श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410 201.Cell9373811677

प्रतिक्रिया व्यक्त करा