You are currently viewing राखी पौर्णिमा

राखी पौर्णिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*राखी पौर्णिमा* 

 

रक्षा बंधनाचा सण

लागे माहेरची ओढ

लाडका भाऊराया

घ्याया येई बैलजोड

 

सैरभैर होई मन

श्रावणाच्या जणु सरी

करु राखीचे स्वागत

आनंद भरला घरी

 

राखी पौर्णिमेचा सण

ओवळीते भाऊराया

ओवाळण्या तुजसाठी

आतुरली माझी काया

 

धागा राखीचा रेशमी

प्रेमभाव असे अंतरी

वाट पाहते भाऊराया

भेटायास ये कधीतरी

 

प्रीत बहिणीची वेडी

राखी बांधण्या अतुर

नको असा रागावुस

का रे असा दूरदूर

 

नको मज ओवाळणी

सुखी आहे माझ्या घरी

औक्षण करुन तुजसी

टिळा लाविते माथ्यावरी

 

लाडका माझा भाऊ

याजसी काय मागु

दिर्घायुष्य लाभो त्यास

हेचं देवाजीस सांगु

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा