You are currently viewing “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ

जिल्हास्तरीय कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ शनिवार दि.17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 01 ते 04 यावेळेत शिवछत्रपती क्रिडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

     या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री, सहकार, नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर रूक्मिणी किसन मोहोळ, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पुणे बालेवाडी येथे होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाहता येणार आहे.

       जिल्हास्तरीय कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे शनिवार, दि.17 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1 ते 4 या वेळेत आयोजित केला आहे.

      तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिला भगिनींनी तसेच “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत विधानसभा क्षेत्रनिहाय गठीत करण्यात आलेल्या निवड समितीचे सन्माननीय अध्यक्ष/सदस्य यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी तथा “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे जिल्हास्तरीय समिती सदस्य सचिव किशोर तावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा