You are currently viewing समूहगीत गायन स्पर्धेत आसोली हायस्कूल आणि परबवाडा शाळा न.१ अव्वल

समूहगीत गायन स्पर्धेत आसोली हायस्कूल आणि परबवाडा शाळा न.१ अव्वल

*समूहगीत गायन स्पर्धेत आसोली हायस्कूल आणि परबवाडा शाळा न.१ अव्वल*

*भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आयोजित समूह गीतगायन स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद*

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने वेंगुर्ला तालुकास्तरिय समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला यांच्या वतीने करण्यात आले होते. सदर समूहगीत गायन स्पर्धा प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटांत संपन्न झाली.सदर स्पर्धा विशाल परब यांनी प्रायोजित केली होती. माध्यमिक गटातून आसोली हायस्कूल ने दहा संघांना मात देत सर्वोत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक पटकावला तर प्राथमिक गटातून जिल्हा परिषद शाळा परबवाडा न.१ यांनी सदाबहार सादरीकरण करत अव्वल स्थान पटकावले.
सदर स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले व बक्षीस वितरण जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व मा.मुख्याध्यापक शामराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . या स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक गटात ११ तर प्राथमिक गटात १० संघांनी सहभाग घेत एका पेक्षा एक सरस देशभक्तीपर समूहगीत गायन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे:
*प्राथमिक गट*
प्रथम:जि.प.शाळा परबवाडा न.१
द्वितीय: जि.प.शाळा वेंगुर्ला न.१
तृतीय: जि.प.शाळा आडेली न .१
उत्तेजनार्थ प्रथम : जि.प.शाळा वेंगुर्ला न.४
उत्तेजनार्थ द्वितीय: जि.प.शाळा वेंगुर्ले न.३

*माध्यमिक गट*
प्रथम: आसोली हायस्कूल, आसोली
द्वितीय: श्री देवी सातेरी हायस्कूल,वेतोरे
तृतीय: रा. कृ.पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला
उत्तेजनार्थ प्रथम: श्री शिवाजी हायस्कूल, तुळस
उत्तेजनार्थ द्वितीय: न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा
सर्व विजेत्या संघाना रोख पारितोषिक,प्रमाणपत्र आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सदर स्पर्धेचे परिक्षण अक्षय सरवणकर आणि केतकी सावंत यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आणि भाजपा पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी तर आभार प्रा.डॉ.सचिन परुळकर यांनी मानले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ , श्रेया मयेकर , आकांक्षा परब , रसिका मठकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा ,युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , मारुती दोडशाणट्टी उपस्थित होते .

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा