लोरे नं.1 गावातील रस्त्यावरील अतिक्रमणविरोधातील उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच
कणकवली
15 ऑगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोरे नं.1 गावातील ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात आपला आवाज उठविला आहे.
लोरे नं.1गावातील सरपंचाने रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, प्रशासनाकडून या तक्रारीवर अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत.
या तक्रारींवर दुर्लक्ष केले जात असल्याने आणि अतिक्रमणधारकांना समर्थन दिले जात असल्याचा संशय निर्माण झाल्यामुळे, गावातील सर्व नागरिकांनी उपोषणाचे हत्यार अवलंबले आहे. 15 ऑगस्ट, हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन असला तरी लोरे नं.1 ग्रामस्थांना अजूनही पारतंत्र्यात असल्याचा अनुभव येत आहे.
ग्रामस्थांचे हे आंदोलन अधिकाऱ्यांनी आणि समाजातील काही राजकीय समाजकंटकांनी दुर्लक्ष केल्यामुळे उभे राहिले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
असा इशारा यानिमित्त प्रशासनाला देण्यात आला असून, प्रशासन ठोस पावले उचलेल, अशी आशा आहे. अन्यथा, ग्रामस्थांचे आंदोलन आणखी तीव्र होईल.
याचबरोबर, लोरे नं.1 ग्रामस्थांनी पत्रकार बांधवांना आवाहन केले आहे की, पत्रकार हा चौथा स्तंभ मानला जातो, आणि त्यांनी या परिस्थितीत आवाज उठवावा. ग्रामस्थांना आशा आहे की पत्रकार बांधव या प्रश्नाची दखल घेऊन, त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.
______________________________
*संवाद मिडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙼𝚊𝚔𝚎 𝚢𝚘𝚞𝚛 𝙿𝚊𝚜𝚜𝚒𝚘𝚗 𝚈𝚘𝚞𝚛 𝙿𝚛𝚘𝚏𝚎𝚜𝚜𝚒𝚘𝚗…*
*𝙲𝚊𝚛𝚎𝚎𝚛 𝚒𝚗 𝙵𝚊𝚜𝚑𝚒𝚘𝚗 𝙳𝚎𝚜𝚒𝚐𝚗𝚒𝚗𝚐…*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-कोणत्याही शाखेची १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 74998 21369*
कृपया पुढील Google form भरावा :
https://forms.gle/k5HygsNxeUTTMJmb7
*Advt
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*