You are currently viewing श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिम्मित ३० ऑगस्ट रोजी पावशी येथे कार्यक्रमाचे आयोजन

श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिम्मित ३० ऑगस्ट रोजी पावशी येथे कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ :

 

महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका कुडाळच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री संतसेना महाराज पुण्यतिथी शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट २०२४ श्रावण वद्य द्वादशी यादिवशी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पावशी येथे श्री उमाजी चव्हाण गणेश मंदिराच्या मागे यांचे घरी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सर्व तालुका कमिटी, विभाग प्रमुख, सभासद, महिला तालुका अध्यक्ष, विभाग प्रमुख, आजी माजी तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, नोकरदार, जेष्ठ नागरिक, युवक व युवतीं यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

कार्यक्रमाची रुपरेषा खालील प्रमाणे – सकाळी ठिक ८.०० वाजता प्रतिमा पुजन, आरती तीर्थ प्रसाद, ८.३० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन, दुपारी १.०० वाजता स्नेह भोजन, दुपारी २.३० वाजता विद्यार्थी गुणगौरव, त्यानंतर ३.३० वाजता महिला हळदी कुंकू, सायंकाळी ७.३० वाजता सर्व विभागातील नाभिक बांधवांची भजने असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व नाभिक समाज बांधवानी कार्यक्रमा दिवशी आपआपला व्यवसाय बंद ठेवून उपस्थित रहाणे आवश्यक आहे अशी प्रार्थनिय विनंती कुडाळ तालुका नाभिक संघटने तर्फे करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा