You are currently viewing कविता स्वातंत्र्याच्या सन्मान पत्र वाटप : वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहाचा उपक्रम

कविता स्वातंत्र्याच्या सन्मान पत्र वाटप : वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहाचा उपक्रम

बुलडाणा :

स्वातंत्र्य दिनाच्या पावन पर्वावर दिनांक १४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहात, ‘कविता स्वातंत्र्याच्या’ विषयावर उपक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रमात महाराष्ट्सह अन्य राज्यातील नामांकित कवी-लेखकांनी सहभागी घेऊन, ‘कविता स्वातंत्र्याच्या’ विषयावर विविधांगी काव्य लेखन केले.

कविता स्वतंत्रत्र्याच्या विषयावर लातूर येथील विद्रोही कवी, प्रा. पी.एस. बनसोडे सर,कवी साहेबराव मोरे चाळीसगाव, तर मुंबई येथील कवी देवेंद्र इंगळकर यांनी “सर्वोत्कृष्ट” काव्यलेखन केले. राष्ट्रकवी संजय निकम, कवयित्री स्वाती कुळकर्णी, डॉ. रमेश जलतारे, कवी तुळशीराम बोबडे, कवयित्री अस्मिता अशोक, कवी अरविंद कुळकर्णी, डॉ अशोक शिरसाट, कवयित्री स्नेहा मुकुंद शिंपी, कवयित्री नीला ताम्हणकर, कवयित्री वत्सला दुसेमोराणकर आदी साहित्यिक लेखकांनी विषयावर आपल्या विविधांगी काव्य सादर केले.

यानिमित्ताने सर्व सहभागी सारस्वतांना ‘वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहाचे सन्मान पत्र देउन गौरवण्यात आले. वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह, साहित्यिक समूह असून,महारास्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक इतर राज्यातील अनेक साहित्यिक सातत्याने लिखाण करतात.

मराठी भाषा व साहित्याची ओळख व निर्मिती व आवड सदैव जोपासना व्हावी. याकरिता साहित्यिक, लेखक कवी यांचे मोलाची योगदान आहे.याच उदार हेतूने वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूहात,अनेक प्रख्यात साहित्यिक, कवी लेखक, समिक्षक, संपादक, पत्रकार यांच्या सह विविध सामाजिक संस्थाचे अनेक मान्यवर, वाचन छंद प्रेमी’साहित्य समूहात सातत्याने कार्यरत आहेत.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकतीच बीए तृतीय वर्षाच्याअभ्यासक्रमात ‘बाबा’ कविता समाविष्ट करण्यात आली असे, अकोला येथील जेष्ठ कवी डॉ अशोक शिरसाट सर सदर लिखाणाचे परिक्षक लाभले आहेत.

दरम्यान,निरपेक्ष परिक्षण करून दिल्याबदल डॉ अशोक शिरसाट सर यांचे तसेच ग्राफिक्सकार, मा. जे. नारायण आमटे सर, उपक्रमाचे मार्गदर्शक तथा बुलडाणा जिल्हा साहित्य भुषण शाहीर मनोहर पवार तथा सर्व सहभागी साहित्यिक, लेखक कवी यांचे, वाचन छंद प्रेमी’ साहित्य समूह, संस्थापक आयोजक बबनराव वि. आराख यांनी आभार व्यक्त करीत, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा