जिल्ह्यातील १ लाख ४ हजार महिलांना लाडक्या बहिण योजनेचा लाभ – प्रभाकर सावंत 

जिल्ह्यातील १ लाख ४ हजार महिलांना लाडक्या बहिण योजनेचा लाभ – प्रभाकर सावंत

१८ तारखेला मेळावा, उपमुख्यमंत्री मार्गदर्शन करणार…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील १ लाख ४ हजार १७४ लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम जमा झाली आहे. या लाभार्थी बहिणींचा रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला १८ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे “लाडक्या बहिणीच्या लाडका देवा भाऊ” या नावाने भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याला ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजने बाबत सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती कार्यालयात भाजपची महत्वाची बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, रणजित देसाई, संजना सावंत, राजू परुळेकर, दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, सावी लोके, प्रसन्न देसाई, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा