*स्वातंत्र्यदिनी वामनराव महाडिक विद्यालयात अनेकविध कार्यक्रम संपन्न*
कणकवली
सुमारे दीडशे वर्षानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन सन 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. यावर्षी 78 व्या स्वातंत्र्यदिनी वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे येथे अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तसेच तळेरे पेट्रोल पंपचे सर्वेसर्वा शरद कोचरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर कनेडी येथे झालेल्या तालुकास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत प्रशालेचे प्रथम क्रमांक प्राप्त गीत गाण्यात आले.
कार्यक्रमावेळी पंचायत स.कणकवलीचे माजी सभापती तसेच भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे,शाळा स.सदस्य शरद वायंगणकर,प्रवीण वरूणकर,उमेश कदम,निलेश सोरप,चंद्रकांत तळेकर, संतोष जठार,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,उपस्थित होते.
यावेळी पाहुण्यांच्या स्वागता नंतर आपल्या प्रास्ताविकातून प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कनेडी येथे झालेल्या देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे ही दोन्ही गाणी प्रशालेचे संगीत शिक्षक अजित गोसावी यांची स्वरचीत गाणी असुन स्वतः तालबद्ध केली आहेत. आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित श्रावणधारा या संगीत स्पर्धेत प्रशालेच्या कु.आर्या घाडी व कु.आरोही चव्हाण या दोन्ही विद्यार्थिनींची प्राथमिक फेरीत निवड झाल्याबद्दल त्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.प्रशालेच्या संगीत क्षेत्रातील प्रगतीसाठी प्रशालेचे संगीत शिक्षक संगीत अलंकार पदवी प्राप्त अजित गोसावी यांनी मेहनत घेतल्यामुळे हे यश मिळाले, त्याबद्दल प्रशालेच्या व शाळा समितीच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.सचिन वाडेकर व निखिल जमदाडे या माजी विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशालेला गुरुदक्षिणा म्हणून रु. 5000 किमतीचे उत्तम प्रकारचे माईक दिले.तसेच माईंड ट्रेनर सदाशिव पांचाळ यांनीही प्रशालेला सहकार्य म्हणून 2000 रु. दिले.या सर्वांचे प्रशाला व शाळा समितीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रशालेच्या सहा. शिक्षिका एस.यु.सुर्वे यांनी केले.
_____________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*