You are currently viewing पुष्पाविष्कार

पुष्पाविष्कार

*ज्येष्ठ साहित्यिका, चित्रकार स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🌹🪷पुष्पाविष्कार🌻💐

 

 

निसर्ग महान सुंदर किमयागार

किती विविधतेने घडवितोसहज

नवनवे रंग सुगंधी आविष्कार

नानाविध प्रकारे फुले पुष्पबीज.

 

सौंदर्याचे कोटी खजिने भुवरी

नित्यनवे उमलती साक्षात्कार

कलिकाही नवे साज लेऊनि दाविती‌ अपुले गंधितआविष्कार.

 

अलगद उमलती रंगपाकळ्या

रंगछटांचे लक्षलक्ष नवसोहळे

आकारांच्या तर्हा‌ निरनिराळ्या

गंधवैविध्याने फुलती बागमळे.

 

वसुंधरेस साजशृंगारा वेळअपुरा

नयनरम्य निसर्गाचा हा नजारा

नेत्रकमली साठवुनिही असेअधुरा

गंधरंगाच्या‌ रानी झुलेमनपिसारा.

 

श्वेत,पीत,रक्तवर्णी,राणीगर्दगुलाबी

निळ्या, जांभळ्या पाचशे छटा

हरितपर्णांच्याही तितुक्याच छबी

केशरी,नारिंगी,कोकमी नसे तोटा.

 

गोल,लांबोळ्या,कळीदार,फुगीर

गुच्छझुबके,तीन,चार,पंचपदरी,

चपट्या,वाटोळया,अणकुचीदार

वेणीसम,एकट्या, गुंतलेल्यासरी.

 

पर्णांचेही नानाविध,गोल,पसरट

झावळ्या,झुबके,काटेरी,दातेरी

दोहोबाजूने ,सपाट,झालरी,लांट

निसर्ग नजारा अद्भूत चमत्कारी.

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

मुंबई, विरार

प्रतिक्रिया व्यक्त करा