You are currently viewing देशभक्ती गीत

देशभक्ती गीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देशभक्ती गीत* 

 

स्वातंत्र्याची पहाट उगवली

 

परवशतेची रात्र मावळली

स्वातंत्र्याची पहाट उगवली॥धृ.॥

 

स्वातंत्र्यभुमीची सकाळ बघण्या

लढले सैनिक,योद्धे, जनता लढली

भारतभूच्या शूरवीरांच्या रक्ताला

अमरत्वाची झळाळी आली ॥१॥

 

परवशेतीची रात्र मावळली

स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

 

परकीयांचे जाच सोसून

विषाचेही अमृत प्राशून

अस्त्र शस्त्राला धार लावूनी

पारतंत्र्याची होळी केली ॥२॥

 

परवशतेची रात्र मावळली

स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

 

राष्ट्रपुरुष, महात्मे, देशभक्त

देशासाठी सांडले त्यांनी रक्त

उच्च-नीच हीनदीन प्रजा जणांची

अखंडता,एकता कामी आली॥३॥

 

परवशतेची रात्र मावळली

स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

 

स्मरुणी त्या वीर पुरुषांना

रणरागिनी , देशभक्तांना

राष्ट्रध्वजाला वंदन करूनी

राष्ट्रगीताने मशाल पेटली ॥४॥

 

परवशतेची रात्र मावळली

स्वातंत्र्याची पहाट उगवली ॥धृ॥

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*(चांदवडकर), धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा